जो नाही कुणाचा हि गुलाम
काल झी २४ तास वर कुलकर्णी पेशव्यांचे कवतिक करीत असताना आमचे मधुकर साहेब चूप बसले... त्यांना काहीच वाटल नाही... ते बामन बम्नेतर लढाई हि लुटू पुतूची लढाई समजतात..... अरे ५०० वीर महार १०००० पेशव्यांच्या सैन्याला भारी पडले हि काय लुतुपुतूची लढाई होती? अरे गेल्या ५००० वर्षांचा राग होता तो..... बाबासाहेबानीच सांगितलं आहे जो समाज स्वताचा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही... मधुकर साहेब तुम्ही भीमा कोरेगावचा महा संग्राम विसरलात... गळ्यातल गाडग आणि पाठीची केरसुणी विसरलात... बहुजन स्त्रियांच्या अब्रूचे काढलेले धिंडवडे विसरलात... ..... बाबासाहेबांनी विजय स्तंभाला अभिवादन केल ते यासाठी कि माझा समाज सतत यातून प्रेरणा घेईल.... त्याला स्वत्वाची जाणीव होईल...... पण तुम्ही त्याला ब्यांरीस्टर गाडगीळ म्हंटले होते तसा काळा स्तंभ केलात ..... कोरेगावच्या स्तंभाला हिणवत तुम्ही शनिवार वाड्याला मुजरा केलात....... तुम्ही एका दमात सर्व इतिहासच पोरका केलात...... महात्मा फुले, शाहू महाराज , आंबेडकर , पेरियार, बुद्ध , महावीर आणि तमाम बहुजनाचा संघर्ष तुमच्या लेखी कवडी मात्र.......... एका रात्रीत स्टार झालात तुम्ही सर ...... भटांचे यार झालात तुम्ही.... पण बाबासाहेबांच्या लेखी गद्दार झालात तुम्ही....... खरच सर तुम्ही महान विचारवंत झालात .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा