शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ आणि सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे

संत चक्रधर, संत नामदेव, संत तुकाराम, म. फुले, शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर इ. बहुजन महापुरूषानि सनातन वैदिक धर्माने केलेल्या शोषणा विरुद्ध प्रखर लढा दिला.  जो वैदिक ब्राह्मणी गुलामगिरीतून बहुजनांच्या मुक्तीचा लढा आहे. हा लढा देत असताना आतून किडक्या पण बाहेरून शक्तिशाली असणार्या जात वंश श्रेष्ठ तावादी वैदिक धर्माच्या ब्राह्मण मुखंडानि  बहुजन महापुरुषाना सतत विरोध केला....  त्यांचा छळ केला.... त्यांना त्रास दिला. 
हा समग्र इतिहासबहुजन समाजापुढे ठेवत असताना सातत्याने दिशाभूल केली जाते.  असे सांगितले जाते कि शिवरायांच्या राज्याभिषेकाला अण्णाजी,  मोरोपंत व महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी विरोध केला ....   मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ यांनी कट कारस्थाने करून शिवरायांचा खून केला.....  मंबाजी भटाने तुकारामान त्रास दिला.....  नामदेवांना कीर्तन करताना ब्राह्मणांनी विरोध केला...   तसाच विरोध शिवरायांना खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ बाजी घोरपडे यांनी केला .   

आणि शिवरायान विरोध करणाऱ्या ब्राह्म्नेतरांची एक लांब लचक यादी दिली जाते. व असा भ्रम निर्माण केला जातो कि पहा जसा ब्राह्मणांनी विरोध केला तसा बहुजानानीही विरोध केला त्यामुळे ब्राह्मण जातीवादी होऊ शकत नाहीत ....  बहुजन द्रोही होऊ शकत  नाहीत.. ....

अ]    पण हा बहुजनांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्यावेळी    मोरोपंत, अण्णाजी शिवरायांच्य राज्याभिषेकाला विरोध करतात, मंबाजी, सालोमालो तुकारामांच्या गाथा लेखनाला विरोध करतात....  त्यावेळी ते सनातन वैदिक धर्म ग्रंथातील  नियमाना प्रमाण मनात असतात .....  धर्म ग्रंथात ब्राह्मणांच्या पूर्वसुरींनी लिहून ठेवलेले आहे कि ब्राह्म्नेतरला लिहण्याचा , प्रबोधन करण्याचा अधिकार नाही.....  क्षत्रियत्व लुप्त झाल्यामुळे त्याला राजा होता येत नाही हा ब्रह्म श्रेष्ठत्वाचा अहंगंड ते जोपासत असतात.....  जर बहुजन शिकला शहाणा झाला....  राजा झाला तारतो ब्राह्मणांच्या चुकांवर बोट  ठेवू शकतो ....त्यांना शिक्षा करू शकतो ......  बहुजन समाजाला जर तुकारामांसारख्या संताने उपदेश केले तर बहुजन समाज शहाणा होईल व ब्राह्मणी वर्चस्व संपुष्टात येईल यासाठी धर्मग्रंथातून वेगवेगळ्या बंदी सांगितल्या आहेत. म्हणून तुकारामांच्या अभंगांवर बंदी घातली त्यांची गाथा पाण्यात बुडविली .. 

ब]  याउलट शिवरायांच लोकोत्तर कार्य ओळखण्याची बाजी घोरपडे, सूर्याजी पिसाळ यांची कुवत  नसल्यामुळे ते विरोध करत असतात....   ब्राह्मण मात्र परंपरेने जोपासलेल्या जात्श्रेष्ठातावादी अहंकारामुळे बहुजन महापुरूषानच्या लोकोत्तर कार्याला समस्त ब्राह्मण जातीच्या फायद्यासाठी  विरोध करत असतात.....  तीच बहुजन द्रोही मानसिकता प्रत्येक ब्राह्मण पिढीत उतरली आहे......  ब्राह्मण पूर्वसुरींनी सनातन बहुजन घातकी  धर्मग्रंथातून मांडलेली पक्षपाती भूमिका ब्राह्मणांच्या रक्तात भिनलेली आहे.... शिव द्रोह पिढ्यान पिढ्यात उतरला आहे  म्हणून आज भांडारकर मधील  बारा भट आजही शिवरायांची बदनामी करतात.......  तुकाराम महाराजांची आजही १२ वी च्या प्रश्न पत्रिकेतून बदनामी  केलीजाते.....   बाबा पुरंदरे सारखे लोक शिव चरित्राच्या नावाखाली ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा डांगोरा पिटतात ......

याउलट सूर्याजी पिसाळ बाजी घोरपडे यांचा विरोध केवळ अज्ञानापोटी अथवा स्वार्थापोटी होता. आजचे पिसाळ व घोरपडे यांचे वंशज पूर्वजांच्या चुकीला चूक मानतात ...... आज कोण पिसाळ घोरपडे शिवरायांच्या विरुद्ध ब्रही काढत नाही......   पण कृष्ण भास्कर कुलकर्णी,  मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ यांचे वंशज आजही शिवरायांची बदनामी करतात यामागे केवळ भटांचा शिवद्रोह आहे....